breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महायुतीत मिठाचा खडा, नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडूंचा विरोध कायम

अमरावती | नवनीत राणांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांना भाजपानं उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यानंतर महायुतीचा भाग असणारे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं दिसत आहे. आज दुपारी ते महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत.

बच्चू कडू म्हणाले की, अभिजीत अडसूळ व आमचं टार्गेट एकच आहे. लोकशाहीचं पतन करणारा उमेदवार आमचं टार्गेट आहे. बाबासाहेबांचं संविधान आणि छत्रपतींचा स्वाभिमान या देशात जिवंत राहायला हवा. त्यासाठी ही लढाई आहे. ही निवडणूक नसून लढाई म्हणून आम्ही स्वीकारू. शुक्रवारी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद होईल. कुणाला सोबत घ्यायचं ते आम्ही ठरवू. एकतर पाठिंबा द्यायचा की उमेदवार जाहीर करायचा हे तेव्हा ठरेल.

हेही वाचा     –       उमेदवारी घोषित होताच श्रीरंग बारणेंची ‘डरकाळी’

२००-३०० कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मागणी केली आहे की मी वर्धा लढावं. किमान केंद्राच्या आयात-निर्यात धोरणाविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे. या कार्यकर्त्यांच्या भूमिका आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. इतर ठिकाणी बिअर बारमध्ये जाऊन मागण्या केल्या जातात. ही पहिलीच वेळ आहे की कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मागणी केली आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button