breaking-newsमनोरंजन

असा आहे मलायकाचा ‘ड्रीम वेडिंग प्लॅन’; या ठिकाणी करणार अर्जुनसोबत लग्न

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा या दोघांनीही त्यांचं नातं प्रसारमाध्यमांसमोर अधिकृतपणे स्वीकारलं आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायकाला अर्जुनच्या रुपात नवं प्रेम मिळालं आहे. गेल्या काही काळापासून या दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यातच आता मलायकाने तिच्या ड्रीम वेडिंगविषयीचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये मलायकाने अर्जुनसोबतच्या ड्रीम वेडिंगविषयी अनेक गोष्टी सांगितल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तिने बीचवर लग्न करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. त्यासोबतच तिला Elie Saab gown गाऊन परिधान करायचं असल्याचंही ती म्हणाली.

“मला बीचवर लग्न करायचं आहे. इतकंच नाही माझी गर्लगँगचं माझ्या ब्राइड्समेड असतील. माझ्या लग्नाची थीमसुद्धा पांढरा रंगच असेल. त्यामुळे आमच्या कपड्यांपासून ते डेकोरेशपर्यंत साऱ्यामध्ये पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात येईल”, असं मलायका म्हणाली.


पुढे ती म्हणते, “अर्जुनला असं वाटतं की मी त्याचे चांगले फोटो काढत नाही. मात्र असं असलं तरी तो एक उत्तम फोटोग्राफर असून माझे सुंदर फोटो तो काढत असतो”. दरम्यान, मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले. त्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. सध्या हे दोघंही मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत.येथील अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button