breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमधील संवाद युवा प्रतिष्ठाणच्या वतीने गरजूंसाठी निशुल्क ‘अन्नपुर्णा अन्नछत्र’

पिंपरी |

चिंचवडमधील संवाद युवा प्रतिष्ठाणच्या वतीने गरजू नागरिक तसेच बॅचलर मुला-मुलींसाठी निशुल्क ‘अन्नपुर्णा अन्नछत्र’ सुरू करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात कामानिमीत्त बाहेर गावाहून आलेले गरजू मजुर वर्ग व कमी पगारात काम करणारी मंडळी चिंचवडेनगर प्रभागात मोठ्या संख्येने आहेत. तसेच लॉकडाऊनमध्ये पगार कपातीमुळे बाहेरील जेवण हे न परवडणारं असल्याने बॅचरल मुला-मुलींवर उपाशी राहण्याची वेळ येत होती. ह्या प्रसंगाला जवळून बघणारे प्रदिप पटेल व माऊली जगताप यांच्या संकल्पनेला संपुर्ण संवाद प्रतिष्ठाणच्या शिलेदारांनी साथ दिली.

त्यानुसार दि.२३ एप्रिल पासुन एक वेळ (फक्त सायंकाळी) निशुल्क अन्नछत्र या परिसरात सुरू केले. ह्या सामाजिक उपाक्रमाला साथ देण्यासाठी समाजातील काही मंडळींनी मदतीचा हात पुढे केला. एका चपाती सेंटर वरून मोफत चपाती मागील आठवड्यापासून चालू झाली. संपूर्ण उपक्रम हा संवादचा सदस्यांच्या स्वखर्चातुन सुरू आहे. यात प्रामुख्याने प्रदिप पटेल, माऊली जगताप, रविंद्र कुवर, राजेंद्र निकम, रामचंद्र पाटील, संदिप पाटील, मोतीलाल पाटील, प्रल्हाद पाटील, गौतम बागुल यांच्या सहकार्याने लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू ठेवण्याचा संवाद युवा प्रतिष्ठानचा मानस आहे.

वाचा- पाबळ ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारणार; आमदार महेश लांडगे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button