breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कांदा नाही खाल्ला तर कोणी मेले आहे का? बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान

पिंपरी : ज्याला कांदा परवडत नाही त्यांनी खाऊ नका, असा सल्ला माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. दरम्यान, दादा भुसे यांचा कित्ता आमदार बच्चू कडू यांनी गिरवला आहे. कांदा नाही खाल्ला तर कोणी मरणार आहे का? मेलं आहे का? असं वादग्रस्त विधान केलं आहे. ते पिंपरी-चिंचवड येथे प्रसार माध्यामांशी बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, कांद्याच्या ताकदीचा लसूण आहे. ते पण खायचं नसेल तर मुळा आहे. सरकार नामर्दासारखं वागतं कधी- कधी, ही नामर्दांगी आहे. सत्ता टिकावी म्हणून हे सरकार ग्राहकाचा, खाणाऱ्याचा विचार करत आहे. पण, पिकवणाऱ्याचा विचार सरकार का करत नाही. मी सरकारमध्ये असलो तरी ही नालायक प्रवृत्ती सरकारने सुधारली पाहिजे. मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. हे माझं कर्तव्य आहे. भाव वाढले म्हणून हस्तक्षेप करता. मग भाव कमी झाल्यास हस्तक्षेप का करत नाहीत? असा प्रश्न ही त्यांनी विचारला.

हेही वाचा – रामदास आठवले यांचा शरद पवारांना सल्ला; म्हणाले, मोदींसोबत.. 

लोकांनी कांदा खाल्ला नाही तर कोणी मरणार आहे का? मेलं आहे का? असं एक तरी उदाहरण दाखवा. मीडिया भाव वाढल्यास दाखवते मग कमी झाल्यास का दाखवत नाही. निर्यात शुल्क लावण्याची काही गरज नव्हती. ऑक्टोबर, नोव्हेंबरची व्यवस्था आज करून ठेवताय? कारण, अटलजी यांचं सरकार कांद्याचे भाव वाढले म्हणून पडलं. एवढं घाबरता का तुम्ही. आयात निर्यातमध्ये स्पष्ट धोरण घेतलं पाहिजे. परदेशात कांदा गेला तर सफरचंदाचा भाव येईल. या संदर्भात आम्ही सरकारच्या विरोधात उतरणार आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button