breaking-newsपुणेमहाराष्ट्र

तांत्रिक खोळंब्याने आरटीओ त्रस्त

दिवाळी सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी आरटीओचे “सर्व्हर डाऊन’


तासन्‌तास रांगेत थांबलेल्या नागरिकांना नाहक मन:स्ताप

पुणे – दिवाळीच्या सलग सहा दिवसांच्या सुट्ट्यानंतर सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुुरु झाले. यामुळे विविध कामासाठी नागरिकांनी सकाळपासूनच कार्यालयात रांगा लावल्या होत्या. मात्र, सोमवारी सकाळपासून सर्व्हर डाऊन झाल्याने कामकाजावर परिणाम होऊन नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला.

राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाल विविध सेवा ऑनलाइन दिल्या जातात. ऑनलाइन यंत्रणेमुळे विविध कामांना गती देण्यात आली आहे. मात्र, ऐनवेळी सर्व्हर बिघाडामुळे कार्यालयीन कामकाजासह इतर कामे संथगतीने सुरू राहत आहेत. सोमवारी सकाळपासूनच सर्व्हर डाऊन झाल्याने टॅक्‍स भरणे, ऑनलाइन परवाना नोंदणी करणे, विविध कर भरण्यास विलंब लागत होता. अनेकदा प्रयत्न करुनही काही जणांचे फॉर्म, छायाचित्र डाऊनलोड होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या.

आरटीओकडून दरदिवशी 300 जणांना ऑनलाइन पद्धतीने शिकाऊ परवाना दिला जातो. यामुळे हे नागरिक सकाळपासूनच कार्यालयामध्ये गर्दी करतात. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे परीक्षेसाठी आलेल्या नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागल्याचे दिसून आले. वाहतुकीच्या नियमांची दंडवसुली दुपटीने वाढल्याने लायसन्स काढणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरटीओ कार्यालयाकडून दिवसाला 300 ते 350 जणांना ऑनलाइन पद्धतीने कच्चा परवाना दिला जात आहे. दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी सर्व्हर बंद पडल्याने अर्जदारांची निराशा झाली. त्यामुळे कच्चा वाहन परवाना, वाहन नोंदणीसह विविध कामकाजाचा आडकाठी निर्माण झाली होती. दरम्यान, सायंकाळी चारनंतर कार्यालयातील सर्व्हर सुरू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button