breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांचा मोठा खुलासा

सहकलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शिजान खानला पोलिसांनी केली अटक

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर अनेक खुलासे होत आहेत. अभिनेत्रीच्या आईनं तुनिषाचा सहकलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शिजान खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना या प्रकरणाचा अधिक तपास करता यावा यासाठी शिजान खानला अटक केली आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान शिजानने तुनिषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे. भिन्न धर्म आणि वयातील अंतरामुळे ब्रेकअप केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर मला खूप त्रास झाला आणि त्यामुळेच त्याने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांने सांगितले. मात्र तुनिषाची मैत्रीण रय्या लबीब हिने तुनिषा आणि शिझानच्या नात्याबाबत अनेक दावे केले आहेत.
तुनिषाला नैराश्याने ग्रासले होते आणि तिच्यावर मानसिक उपचार सुरू होते. तिला याबद्दल बोलायचे नव्हते. शिजानने अनेक मुलींना प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर केला. तो त्या सर्व मुलींची फसवणूक करत होता. त्याचे पडद्यावरचे रूप पाहून मुली प्रभावित व्हायच्या आणि त्याच्याशी मैत्री करायला तयार व्हायच्या, असा आरोप रय्या लबीब हिने शिजानवर केला आहे.
सोबतच, शीजान आणि तुनिषा यांच्यात प्रेमसंबंध होते आणि १५ दिवसांपूर्वीच ब्रेकअप झालं होतं. याच तणावाखाली येऊन तुनिषानं आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. तसंच तुनिषानं सेटवर शीजान याच्याच मेकअप रुममध्ये आत्महत्या केली आहे. त्यामुळे शीजानच्या अडचणी वाढल्या आहेत. यातच शीजानच्या कुटुंबीयांनी मात्र याप्रकरणावर अधिक बोलणं टाळलं आहे. योग्य वेळ आली सविस्तर बोलू, असं शीजानच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button