breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

सुप्रिया सुळेंनी काय केले भाजपचे ‘नामकरण वाचा…

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी…

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मागील काही दिवसांपासून त्यांच्या बारामती या मतदार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून त्या संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत आहेत. दरम्यान आज रविवारी 16 ऑक्टोबर रोजी सुप्रिया सुळे पुरंदर मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका करत चक्क भाजपच नामकरणच केलं आहे. भाजपचं नामकरण करत सुप्रिया सुळे यांनी त्यामागचे कारण सुद्धा सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचं नाव ‘भारतीय जनता लॉन्ड्री’ असं नामकरण केलं आहे. दरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीत येणाऱ्या भ्रष्ट्राचारी लोकांना क्लीनचीट दिलो जाते. म्हणून मी या पार्टीला ‘भारतीय जनता लॉन्ड्री’ असंच म्हणते. सध्या भाजप या पक्षात जुन्या जाणत्या निष्ठावंत व्यक्तींवर अन्याय केला जात आहे, तर आयारामांसाठी रेड कार्पेट टाकलं जातं. असा आरोप सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केला.

खासदार सुप्रिया सुळे नेहमीच स्पष्टपणे वक्तव्यं करतात. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री मंत्रालयात मंत्रिमंडळात कधीच दिसत नाहीत, किंवा ते कधी शेतकऱ्यांच्या बांधावरसुद्धा जात नाहीत जातात. ते मला फक्त सत्कार समारंभातच दिसतात. हे सरकारच नियमबाह्य आहे. विरोधकांची दडपशाही हा एकमेव अजेंडा यांचा आहे. अशी खोचक टीका सुप्रिया सुळेंनी बोलताना केली.

दरम्यान स्मार्ट सिटीवरुनही सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘पुणे बदलतंय ‘ ही भाजपची टँग लाईन कालच्या पावसाळी पुरात पुणेकरांना अनुभवायला मिळालीच आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भाजपने या शहराचं वाटोळं केलं. ट्राफिकची सुद्धा पुरती वाट लावून टाकली आहे, असाही आरोप त्यांनी केला.

दरम्यान,मागील आठवड्यात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघ काय अवघड आहे, असं म्हणत एक प्रकारे सूचक इशाराच दिला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे आज पुरंदर मतदारसंघात पोहोचच्या त्यांनी हवेली तालुक्यातील अनेक सोसायटीमध्ये जाऊन सुप्रिया सुळे यांनी नागरिकांची भेट घेत पाण्याचा प्रश्न आणि कचऱ्याच्या प्रश्नावर त्यांनीसंवाद साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button