TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

ऑटो टॅक्सी कल्याणकारी महामंडळ ताबडतोब घटित करणारा :- उदय सामंत

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत रिक्षा टॅक्सी प्रश्नाबाबत बैठक यशस्वी बाबा कांबळे यांची माहिती

ओला उबेर टॅक्सी चालकांबाबत दर निश्चित करण्यासाठी आगरी कट्टर पॉलिसी मुक्त रिक्षा परवाना ऑनलाइन दंड याबाबत देखील चर्चा

पिंपरीः ऑटो टॅक्सी चालक-मालक घटकांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत यशस्वी चर्चा झाली असून तातडीने कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून लवकरात त्याची अंमलबजावणी करू अशी आश्वासन यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले असल्याची माहिती ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली,

महाराष्ट्रामध्ये वीस लाख ऑटो रिक्षा चालक-मालक असून या घटकांना कोणत्या प्रकारे सामाजिक सुरक्षा दिली जात नाही अपघाती मृत्यूनंतर विम्याचे कवच मेळावा आरोग्य सुविधा मिळाव्यात याबरोबरच मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत मिळावी मुलांचे शालेय शिक्षणासाठी सरकारच्या वतीने मदत मिळावी तसेच रिक्षा चालक-मालकांना म्हातारपणी पेन्शन मिळावी, यासाठी महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून आम्ही करत आहोत,

याबाबत आम्ही मुंबई येथे महाराष्ट्र सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामान्यांची भेट घेऊन त्यांच्या बाबत या प्रश्नाबाबत चर्चा केली तसेच मुक्त रिक्षा परवाना बंद इलेक्ट्रिक रिक्षांना मीटर सक्ती ऑनलाइन दंड, ओला उबेर टॅक्सी व रिक्षा मधील भाड्याचे तफावत कमी करण्यासाठी व इतर प्रश्नांसाठी आघाडी कट्टर पॉलिसी तयार करण्याबाबत वागडी कट्टर पॉलिसीमध्ये विश्वासात घेण्यात यावे या सही ईतरी विविध प्रश्नांवरती यावेळी चर्चा झाली असून लवकरच याबद्दल योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे,

ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळात कृती समितीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस शिवाजी गोरे, कृती समिती उपाध्यक्ष बबलू आतिश खान रिक्षा चालकांचे नेते राहुल कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रवादीच्या युनियनचे अशपाक पठाण, महाराष्ट्र रिक्षा पंचायत ठाणे जिल्हा अध्यक्ष आशिष देशपांडे, आदी उपस्थित होते,

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button