breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतात दैनंदिन रुग्णसंख्या घटली; २४ तासांत १ लाख ३२ हजार ७८८ रुग्ण; मृतांची संख्या मात्र धक्कादायक

नवी दिल्ली |

करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात दैनंदिन करोना रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ३२ हजार ७८८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत घट होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. देशभरात ३२०७ करोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत १ लाख ३२ हजार ७८८ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३२०७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ लाख ३१ हजार ४५६ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत. याआधी सोमवारी १ लाख २७ हजार ५१० करोनाबाधितांची नोंद झाली होती तर २७९५ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

सलग विसाव्या दिवशी नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशातील पाच राज्यांपैकी तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत तमिळनाडूमध्ये २६,५१३, केरळमध्ये १९,७६०, कर्नाटकमध्ये १४,३०४, महाराष्ट्रात १४,१२३ तर आंध्र प्रदेशात ११,३०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात आतापर्यंत २ कोटी ८३ लाख ७ हजार ८३२ जणांना करोनाची लागण झाली आहे. २ कोटी ६१ लाख ७९ हजार ८५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर देशात आतापर्यंत ३ लाख ३५ हजार १०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १७ लाख ९३ हजार ६४५ सक्रिय रुग्ण आहेत. तर २१ कोटी ८५ लाख ४६ हजार ६६७ जणांनी करोनावरील लस घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button