breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा डाव’; छगन भुजबळ यांचा मोठा आरोप

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. असं असतानाच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, ज्यांना कायदेशीरदृष्ट्या आरक्षण देता येत नाही. त्या लोकांना ओबीसीमध्ये घेतलं जात आहे आणि जे आधीपासूनच ओबीसीमध्ये आहेत. त्यांना मात्र ओबीसीतून बाहेर ढकलायचा डाव सुरु आहे. असा दुहेरी कार्यक्रम सरकारचा सुरु आहे.

हेही वाचा – महिलांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावर नितीश कुमार यांनी मागितली माफी; म्हणाले..

मराठा समाजाला सर्व प्रकारचं आरक्षण हवं आहे. एकाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं की त्याच्या नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार. प्रमाणपत्र मिळालं की, त्यांना आरक्षण मिळणार. शैक्षणिक, नोकरी आणि राजकारणात त्यांना आरक्षण मिळणार आहे. यात आमचं म्हणणं आहे की, ओबीसीमध्ये आधीच ३७५ जाती असताना आता हे लोक आहेत. अशात मराठा समाजही यात आला, तर कुणालाच काही मिळणार नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button