breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसला धक्का, सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई – काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.  मुंबईतील गरवारे क्लब हाऊस याठिकाणी झालेल्या प्रवेशाप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश बापट, पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार? 

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जातंय. मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे नैतिकतेचा प्रश्न म्हणूम राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

तसेच, मुलाच्या जागेसाठी एवढा संघर्ष करावा लागतोय, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची खंत व्यक्त केली. पक्षातील विरोधकांचा दिल्लीत हायकमांडसमोर विखेंनी पाढा वाचला. तसेच, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेची दखल घेतली. राहुल गांधी यांनी थेट राषट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादीची दक्षिण नगरच्या जागेबाबत काय भूमिका असेल, हे लवकरच स्पष्ट होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button