World Cup विजयानंतर मिशेल मार्शचा फोटो व्हायरल! नव्या वादाची शक्यता

Mitchell Marsh : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव करून जेतेपदावर सहाव्यांदा नाव कोरलं. मात्र, या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जे घडलं त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज मिशेल मार्श चक्क विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवून बसला आहे. मार्शच्या या कृतीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे हा प्रकार समोर आला आहे. पॅट कमिन्सनं मिशेल मार्शचा खुर्चीवर बसून हातात एक बाटली असलेला फोटो शेअर केला आहे. पण या फोटोत खुर्चीवर रेलून बसलेल्या मार्शच्या पायाखाली चक्क विश्वचषक दिसत आहे. मार्शच्या बाजूलाही ऑस्ट्रेलिया सपोर्ट स्टाफपैकी एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. त्याचा हा फोटो स्वत: कर्णधार कमिन्सनं काढला की आणखी कुणी, हे स्पष्ट होऊ शकलं नसलं, तरी कमिन्सनं तो इन्स्टाग्राम स्टेटसवर ठेवल्यामुळे त्याचंही या कृतीला समर्थनच असल्याचं स्पष्ट होत आहे.
हेही वाचा – ‘डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर..’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Mitchell Marsh, Don't be so proud of your victory, O ignorant one! #ProudOfTeamIndia pic.twitter.com/fMbFm0wEkr
— Vaishnav Sanjay Jadhav (@JVaishu88) November 20, 2023
दरम्यान, मिशेल मार्शच्या या कृतीवर नेटकरी चांगलचे संतापले आहेत. काहींनी हा फोटो शेअर करून थेट आयसीसी व बीसीसीआयला कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रिय आयसीसी व बीसीसीआय, मिशेल मार्शनं त्याच्या पायाखाली विश्वचषक ठेवल्याबाबत मला चिंता वाटत आहे. त्याची ही कृती क्रिकेट खेळाच्या नीतीमूल्यांचा अवमान आहे. कृपया या प्रकाराचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती एका चाहत्याने एक्सवर (ट्विटर) केली आहे.