‘डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर..’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मोठं विधान केलं आहे. डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे झाले असते, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. ते परभणी येथे बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यात मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा विचार आला असता, तर या भारताचे दोन तुकडे करावे लागले असते. आज वर दिल्लीत बसलेल्या लोकांनी हा विचार आपण केला पाहिजे.
हेही वाचा – भारतीय संघाच्या पराभवानंतर महुआ मोईत्रांनी भाजपाला डिवचलं; म्हणाल्या..
सध्या दिल्लीत गोपीचंद, फेकुचंद, तोरडमल हे लोक बसले आहेत. या लोकांचा विचार देश तोडणारा आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
मंदिरातील दानपेट्या काढून टाकल्या, तर मंदिरात एकही पुजारी दिसणार नाही, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.