पिंपरी / चिंचवड

शेतात काम करणा-या महिलेचा गळा आवळून दागिने हिसकावण्याचा प्रयत्न

पिंपरी l प्रतिनिधी

शेतात काम करत असलेल्या महिलेचा गळा आवळून तिच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न झाला. ही घटना गुरुवारी (दि. 24) दुपारी तीन वाजता पुनावळे येथे घडली.

याप्रकरणी महिलेने एका अनोळखी महिलेच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी तिच्या शेतात भाजी उपटत होत्या. दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक अनोळखी महिला शेतात आली. तिने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारून महिलेला जखमी केले. त्यानंतर गळा आवळून गळ्यातील माळ ओढून तोडण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक महादेव यलमार तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button