breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी युवकांची ‘फौज’ सत्ताधारी भाजपाविरोधात आक्रमक; रविकांत वर्पे प्रभारी!

पिंपरी| प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येत्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाची आढाव बैठक घेण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, पंडित गौतम आगा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश, यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांचा युवकच्या वतीने सत्कार करण्यात आला.

त्याचं बरोबर प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर व प्रदेश सरचिटणीस संदीप (लाला) चिंचवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध विषयांवर चर्चा तसेच महानगरपालिका निवडणूका लक्षात घेत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. आणि नवपदनियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकारी
विपुल विलास तापकीर उपाध्यक्ष – पिंपरी चिंचवड शहर
संदीप दत्तू धाइंजे
चिंचवड विधानसभा सरचिटणीस
प्रकाश गुलाब म्हस्के
चिंचवड विधानसभा संघटक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button