पिंपरी / चिंचवड

पत्नीला डिझेल ओतून जाळले : पतीला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना नेहरूनगर पिंपरी येथे शनिवारी (दि. 5) दुपारी पावणे चार वाजता घडली.

बाबू उर्फ राहुल विठ्ठल पारधे (वय 28, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 28 वर्षीय जखमी पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबू याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच आज स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर का झाला म्हणून फिर्यादी पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षय कोकाटे तपास करीत आहेत.
ReplyForward

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button