ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कंपनी ‘एचआर’वर हल्ला ; कामगारासह सहा जण ताब्यात, 1.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड | कामगाराचे एचआर सोबत बिनसल्याने कामगाराने साथिरांसोबत एच आर वर हल्ला केला. याप्रकरणी सहाजणांना ताब्यात घेतले असून, 1.15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एस एच सर्कल, खालुंब्रे येथे 28 जानेवारी 2022 रोजी हा प्रकार घडला.

प्रल्हाद शांताराम बच्चे (वय 28), समीर माणिक कारले (वय 21), अक्षय शिवाजी घाडगे (वय 24), अक्षय उर्फ सुधीर विलास सोनवणे (वय 26), रुपेश खंडु वाळके (वय 30) आणि सचिन रामदास विरकर (वय 30) (सर्व रा. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी यांची नावे आहेत. याप्रकरणी उदय धर्मराज पिसाळ (वय 46, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी याबाबत म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिसाळ व कामगार समीर कारले यांच्यात कोणत्यातरी कारणावरून बिनसले. पिसाळ कारमधून जात असताना आरोपी यांनी त्यांचा पाठलाग केला व गाडी थांबविण्यास सांगितले. एका आरोपीने पिसाळ यांच्या गाडीवर मागून मोठा दगड मारला. फिर्यादी यांनी याबाबत म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपींना ताब्यात घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button