breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणसंपादकीयसंपादकीय विभाग

PCMC: दापोडी-निगडी महामार्गाच्या विकासाला महापालिका आयुक्तांचा ‘खोडा’

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची नाराजी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार तक्रार

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जुना पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी दरम्यानच्या रस्ता अर्बन स्ट्रिट डिझाईनच्या माध्यमातून आधुनिक सोयी-सुविधांसह विकसित करणे प्रस्तावित आहे. मात्र, या कामाला महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी ‘खोडा’ घातला आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अण्णा बनसोडे नाराज असून, आयुक्तांची तक्रार थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली. 

पिंपरी विधानसभा मतदार संघातील दापोडी ते निगडी महामार्गाच्या विकासाचे काम प्रलंबित आहे. यासाठी गेल्या चार वर्षांपासून आमदार अण्णा बनसोडे प्रशासकीय पाठपुरावा करीत आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी या कामाबाबत उदासीनता दाखवली होती. त्यामुळे बनसोडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. 

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार बनसोडे यांना शासन दरबारी दाद मागता आली नाही. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर दापोडी-निगडी रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांनीही या प्रकल्पाची फाईल बाजुला ठेवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बनसोडे यांची नाराजी आहे.  

तसेच,  नर्सिंग कोर्स सारख्या महत्वाच्या मेडिकल सेवा देणारा कोर्ससाठी विद्यार्थ्यांना अनुदान देणे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर फार्मसी सारख्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान देतात त्याप्रमाणे नर्सिंग विद्यार्थ्यांना पण द्यावे, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी केली होती. त्यालाही आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाने बगल दिली आहे. 

यासह खंडोबामाळ ते थरमॅक्स चौक रस्ता, काळभोरनगर शाळा इमारत धोकादायक झाली असून, त्याठिकाणी नवीन इमारत उभारणे प्रस्तावित आहे. प्राधिकरणमध्ये वैद्यकीय दवाखाना बांधण्याबाबत मागणी केली आहे. मात्र, या कामालाही प्रशासनाने स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे, नाशिक फाटा येथील विद्युत मनोरे हटवण्यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. पण, त्यालाही प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. 

थेट जलवाहिनीला मुहूर्त कधी? 

दुसरीकडे, पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या दुसऱ्या टोकावर म्हणजेच दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी या भागात पाणी पुरवठ्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून थेट पाईपने पाणी दापोडी भागातील जलकुंभामध्ये आणण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी निधीचीही तरतूद झाली आहे. मात्र, आयुक्तांकडून या प्रकल्पालाही गती दिली जात नाही. मतदार संघातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने बनसोडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, महायुतीच्या माध्यमातून सत्तेत असतानाही आमदार बनसोडे यांची कामे होत नाहीत, असे चित्र आहे. 

आमदार बनसोडेंची ‘कोंडी’ राजकीय स्पर्धेतून…

पिंपरी विधानसभा मतदार संघात आमदार अण्णा बनसोडे विकासकामांबाबत अपयशी ठरत आहेत. असे चित्र निर्माण करण्यासाठी याच मतदार संघातून तीव्र इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यंत्रणा कामाला लावली आहे. बनसोडे याची ‘विकेट’ काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजकीय ‘फिल्डिंग’ लावण्यात आली असून, प्रशासकीय निर्णयामध्ये बनसोडे यांना ‘साईडट्राईक’ केले जात आहे. विशेष म्हणजे, महापालिका प्रशासन आणि आयुक्त शेखर सिंह कोणत्याही पदावर नसलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन भूमिका ठरवतात. प्रशासनही पायघड्या घातल आहे. ही खेळी जाणीवपूर्णक केली जात असून, आमदार बनसोडे यांची नाराजी वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button