ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

वृक्षमित्र अरुण पवार यांना ‘कार्य-कर्तृत्व पुरस्कार’ प्रदान

संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते हस्ते कार्य-कर्तृत्व पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित

पिंपरी : वृक्षमित्र, समाजसेवक अरूण पवार यांना संवाद व्यासपीठ हरिशजी मोरे आणि मित्र परिवाराच्या वतीने संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते हस्ते कार्य-कर्तृत्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

वृक्षमित्र अरुण पवार यांनी मराठवाडा जनविकास संघाची स्थापन करून सन २०१२ पासून लाखो वृक्षाची लागवड केली आहे. भंडारा डोंगर, देहूगाव मरकळ, शिंदेवाडी, पिंपळे गुरव, नवी सांगवी अशा अनेक भागांमध्ये वृक्षारोपण करून संगोपन करतात. आजही ते त्या वृक्षांचे संगोपन करत आहेत. तसेच विविध उपक्रमात लाखो वृक्षांचे दान देखील त्यांनी केले आहे. धारूर ते तुळजापूर बायपास पर्यंत. धारूर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यापर्यंत हजारो वृक्षांची लागवड केली आहे.

तसेच देहु-आळंदी येथील भंडारा डोंगरावरही हजारो वृक्षारोपण करून संगोपन करणे चालू आहे. मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून गोरगरीब, मजदूर, अपंग, विद्यार्थी, शेतकरी,गो-शाळा, रानावनातील मुके प्राणी, देहु-आळंदीहून पंढरपूर कडे निघालेल्या पालख्यांना, संताना, समाजसेवक, राजकारणी, तसेच समाजातील वंचित व एकदम खालच्या पातळीवरील काम करणाऱ्यांना आर्थिक मदत, बहुमोल साथ, मार्गदर्शन ते सदैव करत असतात. याच कार्याची दखल घेऊन धारूर येथील ग्रामस्थांनी बंधु बालाजी काका पवार यांना बहुमतानी सरपंच पद देऊन विकासासाठी संपूर्ण ग्रामपंचायत ताब्यात दिली आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, धारूर रत्न पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार असे शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अश्या समाज सेवकाला पुणे-पिंपरी चिंचवड येथील संवाद व्यासपीठाचा कार्य-कर्तृत्व पुरस्कार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button