breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Asia Cup 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान सामना श्रीलंकेत खेळला जाणार

Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेचं संपुर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी नेतृत्वाखाली हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यामुळे आशिया चषक २०२३ ही स्पर्धा श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे.

आषियाई क्रिकेट परिषदेने १९ जुलै रोजी आशिया चषक २०२३ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ संघात ३० ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान सामना २ सप्टेंबरला होणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कँडी येथे खेळला जाणार आहे. तर आशिया कप २०२३ चा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.

हेही वाचा – दुर्दैवी! मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार

आशिया कप २०२३ चे सामने भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या संघात होणार आहेत. नेपाळ, पाकिस्तान आणि भारत हे गट-अ मध्ये आहेत. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे गट-ब मध्ये आहेत. तर अशिया चषक २०२३ या वर्षी ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.

आशिया कप २०२३ चे संपुर्ण वेळापत्रक :

३० ऑगस्ट – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान
३१ ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, कॅंडी
२ सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, कॅंडी
३ सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर – भारत विरुद्ध नेपाळ, कॅंडी
५ सप्टेंबर – नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान

६ सप्टेंबर – A1 विरुद्ध B2, लाहोर
९ सप्टेंबर – B1 विरुद्ध B2, कँडी
१० सप्टेंबर – AI विरुद्ध A2, कँडी
१२ सप्टेंबर – A2 विरुद्ध B1, डंबुला
१४ सप्टेंबर – A1 विरुद्ध B1, डंबुला
१५ सप्टेंबर – A2 विरुद्ध B2, डंबुला
१७ सप्टेंबर – अंतिम सामना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button