breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

दुर्दैवी! मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार

Manipur Violence : मणिपूरमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ मे रोजी मणिपूरमधील थौबाला जिल्ह्यात ही घटना घडली आहे. संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी याप्रकणी अज्ञांतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यावरून राजकारण चांगलेच तापलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे रोजी घडली आहे. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य पोलीस दल आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. ५ जिल्ह्यांमधील जमावबंदीबाबतही शिथिलता काढण्यात आली असून तेथे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत हिंसाचारात सहभागी झालेल्या ४५२ जणांना अटक केली आहे.

हेही वाचा – ‘माळीण’ची पुनरावृत्ती! रायगडच्या इर्शाळवाडीत दरड कोसळली, अनेक जण बेपत्ता

मणिपूरमधील घटनेवरून शरद पवार यांची संतप्त प्रतिक्रिया

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मणिपूरमधील विदारक दृश्य पाहून मन दुखावलं आहे. विशेषत: महिलांवरील अत्याचाराचं विदारक दृश्य घृणास्पद आहे. त्यामुळे हीच वेळ आहे संघटित होण्याती, आपला आवाज उठवण्याची आणि मणिपूरच्या लोकांसठी न्याय मागण्याची. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयासह गृह विभागाने तातडीने आवश्यक कारवाई करणे आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button