breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीव्यापार

महिंद्रा आणि महिंद्रा कंपन्यांचे ट्रॅक्टर्स पुढच्या महिन्यापासून महागणार

नवी दिल्ली – कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता आणखी एक मोठा धक्का सहन करावा लागणार आहे. कारण, शेतकऱ्यांसाठी सोयीची ठरलेली महिंद्रा अँड महिंद्राचे ट्रॅक्टर्स महागणार आहे.

येत्या २०२१ या नव्या वर्षांत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ट्रॅक्टरची किंमत वाढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. इनपूट कॉस्टच्या प्रभावाला ऑफसेट करण्यासाठी ट्रॅक्टरच्या किंमतीत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2021पासून महिंद्राच्या सर्व ट्रॅक्टर्सच्या किंमती वाढणार आहेत. कमोडिटी किंमतीतील वाढ आणि इतर इनपूट कॉस्ट वाढल्याने ट्रॅक्टर्सच्या किंमती वाढवण्याची गरज निर्माण झाली होती. येत्या काही दिवसात वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमतींची माहिती दिली जाणार आहे. गेल्या आठवड्यात या कंपनीने पुढच्या महिन्यापासून पॅसेंजर आणि कमर्शियल व्हिकलच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. हे वाढलेले भाव सर्व मॉडल्सला लागू होणार असल्याचंही कंपनीने म्हटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button