पिंपरी / चिंचवड

सरकारी पाईप लाईनचे 13 लाख 50 हजारांचे पाईप चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे खराबवाडी येथील 13 लाख 50 हजार रुपये किमतीचे पाईपलाईनचे पाईप अज्ञातांनी चोरून नेले. हा प्रकार 8 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत घडली.

शाखा अभियंता राजेश देवदत्त कुलकर्णी (वय 50) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथील वाघजाईनगर येथे पाण्याच्या टाकीजवळ महराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाईपलाईन करण्यासाठी पाईप आणून ठेवले होते. 8 ते 10 एप्रिल या कालावधीत अज्ञातांनी 13 लाख 50 हजर रुपये किमतीचे डी आय के 9 या प्रकारचे 120 पाईप चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button