breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा लढ्यात हौतात्म्य पत्कारलेल्या १७ शहीदांना अभिवादन

कोल्हापूर |

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात हौतात्म पत्कारलेल्या १७ शहीदांना अभिवादन करण्यासाठी आज बेळगावमध्ये हुतात्मा दिन पाळण्यात येतो. या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी सीमा विकास प्राधिकरणाने केली होती. कन्नडिगांच्या विरोधाला न जुमानता आज सकाळपासून अभिवादन कार्यक्रमाची बेळगावात तयारी सुरू आहे. सीमाप्रश्नी आजवर अनेक आंदोलने झालीत. या आंदोलनात अनेकांनी हौतात्म्य पत्कारले. त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

भाषावार प्रांतरचना करण्यासाठी नेमलेल्या राज्य पुनर्रचना समितीचा अहवाल १० ऑक्टोबर १९५५ रोजी केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. तर १६ जानेवारी १९५६ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी या अहवालातील शिफारसी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आणि बेळगाव कारवारचा मराठी सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात गेला. मुंबई, बेळगावसह अनेक ठिकाणी प्रक्षोभक उद्रेक होऊन १७ जानेवारी रोजी बेळगावमध्ये गोळीबार झाला होता आणि त्यात अनेकांनी प्राण गमावले होते. यातील शहिदांना आज अभिवादन करण्यात येते.

  • गतवर्षी मंत्र्यांना रोखले होते…

गतवर्षी बेळगावातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगावला निघाले होते. याच दिवशी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा बेळगाव दौरा होता. सुरक्षेचे कारण सांगून मंत्री पाटील यांना कर्नाटकात जाण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यावर मराठी भाषेत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button