breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजपाच्या उपाध्यक्षपदी कुणाल लांडगे यांची नियुक्ती

जगताप-लांडगे यांचे समर्थक अन्‌ युवकांमधील मोठा जनसंपर्काची पक्षाकडून दखल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील लोकनेते आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक अन्‌ आमदार महेश लांडगे यांचे बंधू असलेल्या कुणाल लांडगे यांची भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवडच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी कुणाल लांडगे यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी माजी सत्तारुढ पक्षनेते तथा सरचिटणीस नामेदव ढाके, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, भारत केसरी विजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – ‘राम मंदिर उद्घाटनादिवशी दिवाळी साजरी करा’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन

२०१७ मध्ये कुणाल लांडगे यांनी संत तुकाराम नगर प्रभागातून महापालिका निवडणूक लढवली होती. भाजपाच्या तिकीटावर लढवलेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीमध्ये त्यांचा अल्पमतांमध्ये पराभव झाला होता.

मात्र, युवकांचे संघटन आणि प्रभावीपणे काम करण्याची पद्धती यामुळे पक्षाने कुणाल लांडगे यांना २०१८ मध्ये स्वीकृत नगरसदस्यपदी संधी दिली होती. स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांचे बंधू असल्यामुळे त्यांच्या पाठिशी राजकीय ताकद आहे. विशेष म्हणजे, युवा वर्गात मोठा जनसंपर्क असल्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा त्यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button