breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘राम मंदिर उद्घाटनादिवशी दिवाळी साजरी करा’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील अयोध्येतील विमानतळ आणि रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलं. तसेच त्यांनी वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यादरम्यान त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधितही केले. आयोध्येतील राम मंदिराचं २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. या दिवशी दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी देशातील संपूर्ण १४० कोटी नागरिकांना प्रार्थना करतो की, २२ जानेवारीला सर्वांनी श्रीराम ज्योती लावा. दीपावली साजरी करा. २२ जानेवारीची संध्याकाळ पूर्णपणे झगमगित असायला हवी. फक्त आता काही दिवस वाट पाहा, साडे ५०० वर्षांचं काम आहे. संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशा प्रसंगात अयोध्येच्या नागरिकांमध्ये उत्साह असणं हे स्वाभाविक आहे. भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि जनाचा मी पुजारी आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच उत्सुक आहे.

हेही वाचा   –  उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश 

एक काळ असा होता की, रामलल्ला तंबूत विराजमान होते. आज फक्त रामलल्लाला पक्क घर मिळत नाहीय तर ४ कोटी गरिबांनादेखील मिळालं आहे. आज भारत कशी विश्वनाथच्या निर्माणासोबत ३० हजारपेक्षा जास्त पंचायत घर तयार झाले. आज देशात महाकाल महालोकचं निर्माण झालं नाही तर हर घर हर जल पोहोचलं. अयोध्येत आज विकासची भव्यता दिसत आहे. काही दिवसांनी भव्यता आणि दिव्यता दोन्ही दिसतील. हीच गोष्ट भारताला २१ व्या शतकात पुढे घेऊन जाणार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

देशाच्या इतिहासात ३० डिसेंबरची तारीख खूप ऐतिहासिक राहिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजच्याच दिवसी १९४३ मध्ये अंदमानमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा जयघोषाचा झेंडा फडकवला होता. स्वातंत्र्याच्या दिवशी जोडल्या गेलेल्या अशा पवित्र दिवशी आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाळ संकल्पाला पुढे नेत आहोत. आज विकसित भारताच्या निर्माणाला गती देण्याच्या अभियानाला अयोध्या नगरीला नवी ऊर्जा मिळाली. आज इथे १५ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण झालं आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button