TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील २३ अधिकाऱ्यांची पदोन्नतीसह नवीन ठिकाणी नियुक्ती

राज्य पोलीस दलातील २३ सहाय्यक पोलीस आयुक्त व उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश बुधवारी गृहविभागाने दिले. त्या आदेशानुसार राज्य सायबर सुरक्षा विभाग व राज्य दहशतवाद विरोधी पथकात प्रत्येकी एक, तर राज्य गुप्तवार्ता विभागासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदेशानुसार, प्रशांत परदेशी यांची मंत्रालय सुरक्षा उपायुक्तपदी, अश्विनी पाटील यांची उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई), तर प्रितम यावलकर यांची राज्य सायबर सुरक्षा (मुंबई) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, जयंत बजबळे यांची मीरा-भाईंदर-वसई-विरार येथे उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पियुष जगताप यांची अपर पोलीस अधीक्षक (यवतमाळ), बाबुराव महामुनी यांची अपर पोलीस अधीक्षक (बुलढाणा), शिलवंत नांदेडकर यांची पोलीस उप आयुक्त (औरंगाबाद शहर), प्रिती टिपरे यांची पोलीस उप आयुक्त ( ‘डायल ११२,’ नवी मुंबई), समीर शेख यांची पोलीस अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्ष ( पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई) येथे नियुक्ती करण्यात आली.

तसेच राहुल मदने यांची पोलीस उप आयुक्त (नागपूर शहर), रीना जनबंधू यांची अपर पोलीस अधीक्षक (चंद्रपूर), अमोल गायकवाड यांची समादेशक, राज्यराखीव पोलीस दल (गोंदिया), कल्पना भराडे यांची प्राचार्य, अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र ( नागपूर), ईश्वर कातकडे यांची अपर पोलीस अधीक्षक (भंडारा), अर्चना पाटील यांची पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग (मुंबई), तर दत्ता तोटेवाड यांची अपर पोलीस महासंचालकांचे (विशेष कृती) कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शीतल झगडे यांची उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई), पंकज शिरसाट यांची उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई), नवनाथ ढवळे पोलीस उप आयुक्त ( ठाणे शहर), रत्नाकर नवले यांची उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई), तसेच सागर कवडे यांची अधिक्षक, दहशतवाद विरोधी पथक (मुंबई) येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अशोक विरकर यांच्या नियुक्तीबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button