ताज्या घडामोडीराष्ट्रिय

इंधन दरवाढ! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

नवी दिल्ली | भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ केली. त्यात पेट्रोल प्रति लिटर ८४ पैसे आणि डिझेल प्रति लिटर ८५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल ११२ रुपये ५१ पैसे आणि डिझेल ९६ रुपये ७० पैसे लिटर झाले आहे. इंधन दरवाढीमुळे ४ दिवसांत पेट्रोल आणि डिझेल २.४० रुपयांनी महागले आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना भारतात ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे देशातील इंधनाचे दर स्थिर होते. मात्र १३७ दिवसानंतर भारतात इंधन दरवाढ सुरू झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या इंधन दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर ८८ रुपये २७ पैसे झाला आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button