breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ

नवी दिल्ली – देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. त्यात आज सलग सातव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 95.46 रुपयांवर पोहोचले असून डिझेलचे दर 86.35 रुपयांवर पोहेचले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस अशीच वाढ सुरू राहिली तर इंधनाचे दर लवकरच शंभरी गाठतील अशी भीती सर्वसामान्यांना सतावत आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे आधीच त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत.

आज पेट्रोलच्या दरात 26 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेल 29 पैशांनी महागले आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.46 रुपयांवर पोहोचले असून डिझेलचे दर 86.35 रुपयांवर पोहेचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे इंधन दरवाढ होताना दिसत आहे.

देशातील चार प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर
मुंबई : पेट्रोल – 95.46 रुपये, डिझेल – 86.35 रुपये
बंगळूरू : पेट्रोल – 91.97 रुपये, डिझेल – 84.12 रुपये
चेन्नई : पेट्रोल – 91.22 रुपये, डिझेल – 84.45 रुपये
कोलकाता : पेट्रोल – 90.27 रुपये, डिझेल – 82.94 रुपये

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button