breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खिलाडू वृत्तीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची वद्धी!

सहायक शिक्षण उपसंचालक ज्योती परिहार यांचे मत

गायत्री इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिवस उत्साहात

पिंपरी : शालेय शिक्षणात जेमतेम प्रगती असलेला सर्वसामान्य कुटुंबातील सचिन तेंडूलकर भारताचा महान क्रिकेटपटू बनू शकतो. क्रीडा क्षेत्रातील अतुल्य कामगिरीसाठी त्याला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येते. सगळेच आयुष्यात यशस्वी होतात असे नाही. पण, एखादा खेळ जोपासला तर खिलाडू वृत्ती तयार होते आणि विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासामध्ये वृद्धी होते. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते. ही बाब शिक्षक आणि पालकांनी लक्षात घेतली पाहिजे, असे मत सहाय्यक शिक्षण उपसंचालक ज्योती परिहार यांनी व्यक्त केले.

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या (एसव्हीएसपीएम) भोसरी येथील ग्रायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. क्रीडा स्पर्धांची सुरूवात परिहार यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आली.

हेही वाचा  –  ‘भुजबळांकडे पेढे खायला, प्रफुल्ल पटेलांकडे जेवायला जाणार’; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

यावेळी १९ वर्षांखालील प्रो कबड्डी लीगमध्ये सुवर्णपदक पटकावणारा खेळाडू सुनील लांडगे, व्यवस्थापकीय संचालक कविता भोंगाळे यांच्यासह क्रीडा विभागाचे शिक्षण, कर्मचारी उपस्थित होते.

शाहुनगर येथील राजर्षि श्री शाहू महाराज क्रिडांगण येथे गायत्री स्कूलच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांचे वर्गवार गट करण्यात आले असून, विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि मेडल देण्यात येणार आहे.

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्वच शाखांमध्ये प्रतिवर्षी वार्षिक क्रीडा दिवस आयोजित केला जातो. शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी प्रेरणा मिळावी. या हेतूने होणाऱ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थींही उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळावी. या करिता शाळा व्यवस्थापन प्रयत्नशील असते.

कविता भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालक, एसव्हीएसपीएम.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button