breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत ‘खेळ रंगला पैठणीचा’ महिलांची धम्माल!

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

सामाजिक कार्यकर्त्या कविता भोंगाळे यांचा पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी
घर…कुटुंब…आणि रोजच्या धावपळीतून महिलांना मनमुराद आनंद घेता आला पाहिजे. महिलांच्या कर्तुत्वावाला संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या कविता भोंगाळे यांनी केले.

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथे गायत्री सखी मंच व कविताताई भोंगाळे युवा मंचच्या पुढाकाराने सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व सह्याद्री मळेगावकर प्रस्तुत होम मिनिस्टर “खेळ रंगला पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भोंगाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भोसरीतील डॉ. बाबासाहेब उद्यान समोर विदर्भ मित्र मंडळजवळ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद मिळला. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, शिवांजली सखी मंच अध्यक्षा पूजा लांडगे, प्रिया लांडगे, सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, प्रसिद्ध उद्योजक विनायक भोंगाळे, माजी नगरसेवक सागर गवळी, विकास डोळस, वसंत लोंढे, भीमा फुगे, दत्ता गव्हाणे, कविता गव्हाणे, कुलदीप परांडे, हरिभाऊ तांदळे, रवींद्र नांदुरकर, स्वाती शिर्के, मनीषा गंगणे, संदीप पंडित व श्री शंकर महाराज यांचे शिष्य जगदीश महाराज उपस्थित होते.

कविता भोंगाळे म्हणाल्या की, महिलांच्या कर्तुत्वाला वाव देण्यासाठी आमदार महेश लांडगे व शिवांजली सखी मंच अध्यक्षा पूजा लांडगे ‘इंद्रायणी थडी’ जत्रेच्या माध्यमातून व अन्य सामाजिक उपक्रमातून कार्यरत असतात त्यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून गृहिणींच्या मनोरंजना करिता हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.

गरजवंत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप…

भोसरी परिसरातील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच, किल्ले स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच, सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांनी महिलांच्या मनोरंजनाकरिता विविध खेळ घेऊन विजेत्या महिलांना एल.ई.डी. टीव्ही, ओव्हन, टेबल फॅन,मिक्सर, गॅस शेगडी व 11 मानाच्या पैठण्या तसेच खेळात सहभागी प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button