breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अनिल परबांचा पाय खोलात?; सीएच्या निवासस्थानी ईडीची धाड

मुंबईः राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित सात ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) छापे टाकण्यात आले आहेत. तर, अनिल परब यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनिल परब यांचे लेखा परिक्षक (सीए) यांच्या घरीही ईडीने धाड टाकली आहे. (ed raided at anil parab)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणी ईडीने कारवाई केली आहे. त्यात परब यांचे शासकीय निवासस्थान, वांद्रे येथील खआसगी निवासस्थान, दापोलीतील रिसॉर्ट तसंच, अनिल परब यांच्या सीएच्या घरीही ईडीचे एक पथक पोहोचले आहे. आज सकाळीच ईडीने ही कारवाई केली आहे. ही सर्व ठिकाणे मुंबई, पुणे आणि दापोली परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अनिल परब यांच्या सीएच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. त्या चौकशीतून ईडीला नेमकं काय अपेक्षित आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. याआधी अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे सीए आधी आयकर विभागाच्या रडारवर होते. आता ईडीकडून झाडाझडती सुरु झाली आहे.

दरम्यान, ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांची चौकशी झाली होती. तसंच, अनिल परब यांच्यासोबत त्यांच्या सीएवरही गुन्हा दाखल होणार का? हे पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणात त्याचीही चौकशी होणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरही ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तब्बल दोन महिन्यांपासून नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. आता अनिल परब यांच्यावरही ईडीने थेट गुन्हाच दाखल केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.अनिल परब यांच्यावरील ही कारवाई शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button