breaking-newsराष्ट्रिय

स्पेशल फोर्सेसच्या ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा पथकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या तिन्ही मृत दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. जहांगीर रफीक वानी, राजा उमर मकबूल भट आणि उझेर अहमद भट अशी या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत.

त्रालमधील एका गावात हे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी या गावाला घेराव घालून शोध मोहिम सुरु केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत या तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. जहांगीर रफीक वानी हिजबुल मुजाहिद्दीनचा त्रालमधील कमांडर होता. कमांडर हम्माद खानच्या मृत्यूनंतर सूत्रे त्याच्याकडे आलेली होती.

नोव्हेंबर २०१९ मध्ये मेहराजुद्दीन झरगर, त्यानंतर गुलाम नबी मीर या नागरीकांच्या हत्येमध्ये या दहशतवादी गटाचा सहभाग होता. राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवार संध्याकाळपासून या दहशतवाद्यांची शोध मोहिम सुरु केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button