breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

अमोल कोल्हे अमृता खानविलकर बरोबर लग्न करणार? अमोल कोल्हे म्हणाले,..

पुणे : राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नेहमी अभिनय आणि राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. मात्र, नुकतीच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर एका वृत्तपत्रातील बातमीचा फोटो शेअर केला आहे. अमोल कोल्हे लवकरच अभिनेत्री अमृता खानविलकरसह लग्नगाठ बांधणार अशी बातमीची हेडलाईन आहे. या मथळ्याखालील या बातमीचा फोटो अमोल कोल्हे यांनी शेअर केला आहे. या मूळ बातमीपेक्षा त्यातील शेवटची ओळ चांगलीच चर्चेत आहे.

खासदार अमोल कोल्हे हे सध्या बायकोला कंटाळले आहेत. वाजले की बारा फेम अमृता खानविलकर हिच्या प्रेमात ते पागल झाले आहेत. लवकरच ते पहिल्या बायकोला घटस्पोट देऊन दोघे विवाहबद्ध होणार असल्याचे चित्रपटक्षेत्रात बोलले जात आहे. या विवाहाचा माझ्या राजकीय कारकीर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्यामुळे मी पण उपमुख्यमंत्री होऊ शकेन कारण अमृता हे नावच लकी आहे राजकारण्यांना असे ते म्हणाले, अशी बातमी आहे.

या बातमीचा फोटो अमोल कोल्हे यांनी शेअर करत म्हटलं आहे की, हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज १ एप्रिल आहे हे माहित होतं… नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!

https://www.instagram.com/p/Cqf5Fz1pGmP/?utm_source=ig_web_button_share_sheet

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button