breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांपासून ते आशा वर्करपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहन पर भेट दिली आहे. करोना संकटाच्या काळात अनेकांचं अर्थकारण बिघडलं आहे. अशातच राज्य सरकराने अंगणवाडी सेविकांपासून ते आशा वर्करपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक बळ दिल्याने या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकुण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ग्रामविकास विभागांतर्गत सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. ग्रामविकास विभागाचे हे कर्मचारी म्हणजे या व्हायरसच्या विरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे या रकमेचे वितरण करण्यात आले आहे.

याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांना ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णयही ग्रामविकास विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button