ताज्या घडामोडीराष्ट्रिय

यूक्रेनमध्ये रशियाच्या गोळीबारात अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू, दोघे जखमी

न्यूयॉर्क |  रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू झाला आहे.एएफपीने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.युक्रेनमध्ये रशियन आक्रमण तीव्र होत असताना ही घटना घडली आहे. ब्रेंडट रेनॉड (५१) असे मृत पत्रकाराचे नाव आहे. रेनॉड हे एक चित्रपट निर्माताही होते. रशियाच्या हल्ल्यातच या पत्रकाराचा मृत्यू झाल्याचे यूक्रेनने म्हटले आहे.

युक्रेनची राजधानी किव्ह येथे न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार ब्रेंडट रेनॉड (५१) यांना गोळ्या लागल्या होत्या.रशियन सैन्याने इरपिनजवळ एका कारवर गोळीबार केला होता तेव्हा ही घटना घडली.या पत्रकाराकडे न्यूयॉर्क टाईम्सचे ओळखपत्र सापडले आहे.त्यांच्या मृत्यूबाबत न्यूयॉर्क टाईम्सने शोक व्यक्त करत ते २०१५ मध्ये आमच्याकडे काम करत होते. ते एक प्रतिभावान चित्रपट निर्माता होते असे म्हटले आहे.
त्यांच्यासोबत असलेले आणखी दोन पत्रकार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,असा दावा अँड्री नेबिटोव्ह यांनी केला आहे.रविवारी पोलंड सीमेजवळ रशियन हवाई हल्ल्यात ३५ जण ठार झाले, तर ५७ हून अधिक जखमी झाले आहेत.

दरम्यान, सैन्याने युक्रेनची राजधानी किव्हचा वेढा तीव्र केला आहे. युक्रेनचा दावा आहे की रशियाने लिव्ह शहरात आठ मोठे हल्ले केले आहेत. यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. रशियाने हे हवाई हल्ले अशा वेळी केले आहेत जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नेते या संकटावर मुत्सद्दीपणे तोडगा काढण्यात गुंतले आहेत. रशियाने किव येथील लष्करी प्रशिक्षण शिबिरावर आठ क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे, रशियाने युक्रेनच्या राजधानीला पूर्व, उत्तर आणि ईशान्येकडून वेढा घातला असून जोरदार हल्ले सुरू केले आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही किवमधील प्रत्येक वळणावर रशियन सैन्याशी लढू,असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button