ताज्या घडामोडीमुंबई

श्रीलंकेत महागाई बोकाळली; ब्रेड पॅकेट तब्बल १५० रुपयाला

कोलंबो  | सध्या रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम सर्वच स्तरातील जागतिक अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. या दोन्ही देशांपासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या श्रीलंकेत तर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. या देशात महागाई बोकाळली आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने श्रीलंकेत सर्वत्र महागाईचा भस्मासुर आला आहे. अन्नधान्याचे संकटही उभे ठाकले आहे. दुधाचे दर सोन्याहून अधिक झाले आहेत. त्यामुळे देशात दिवाळखोरीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेत महागाईमुळे गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जवळपास एक हजार बेकऱ्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे ब्रेडच्या एका पॅकेटच्या किंमत १५० रुपयांवर पोहचली आहे. चिकन तर सामान्य लोकांच्या बजेटच्या बाहेर गेले आहे. दिवसभरात ७ तासांपेक्षा अधिक वेळ वीज गायब असल्याने लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय अगोदरच ठप्प झाला आहे. जवळपास ५ लाख लोकांचा रोजगार पर्यटनावर अवलंबून आहे. तर, २० लाख अप्रत्यक्षपणे पर्यटनाशी जोडले गेलेले आहेत.चीनसह अनेक देशांच्या कर्जात बुडालेला श्रीलंका दिवाळखोर जाहीर होऊ शकतो.जानेवारीत श्रीलंकेची परकीय चलन गंगाजळी ७० टक्के कमी होऊन २.३६ अब्ज डॉलर झाली आहे.श्रीलंकेला आगामी १२ महिन्यात ५४ हजार कोटींचे देशांतर्गत आणि विदेशी कर्ज चुकते करायचे आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button