breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ऑक्सिजन संपल्याने तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू; चाकण ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

चाकण |महाईन्यूज|

चाकणमधील एका खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने (Oxygen Shortage in Chakan Pune) तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचप्रमाणे, 20 अत्यवस्थ रुग्णांना मंगळवारी पहाटे तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. मृतांमध्ये 25 वर्षीय युवक, 45 वर्षीय गृहस्थ आणि 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या (Chakan Rural Hospital) वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले.

ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मध्यरात्री रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या वीस रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना अन्यत्र हलविण्याच्या सूचना केल्या. रुग्णालय प्रशासनाने पहाटे साडेतीन-चार वाजल्यानंतर या रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविण्याच्या सूचना केल्याने नातेवाईक हतबल झाले. यानंतर काही रुग्णवाहिका आल्या. यातील काही रुग्णांना नातेवाईकांनी इतर ठिकाणी हलवले. मात्र, काही रुग्णांच्या नातेवाईकांना व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाले नाहीत. यात तीन जणांना प्राण गमवावे लागले. नेमका किती जणांचा मृत्यू झाला, काय परिस्थिती होती, याची पडताळणी सुरू असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button