breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#America |10 हजार लोकांची काेराेना, अँटिबाॅडी तपासणी करणारे ‘बाेलिनस’ जगातील पहिले गाव

सॅनफ्रान्सिस्काे | अमेरिकेत उत्तर कॅलिफाेर्नियाच्या बाेलिनस गावात १० हजार लाेकांची तपासणी केली जात आहे. त्यात काेराेना तपासणीबराेबरच अँटिबाॅडी टेस्टचाही समावेश आहे. संपूर्ण गावाची अशा प्रकारे तपासणी करणारे हे जगातील पहिलेच गाव ठरले आहे. अमेरिकेत महामारी पसरल्यानंतर अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

या प्रकल्पावर युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफाेर्निया-सॅनफ्रान्सिस्काे (यूसीएसएफ) येथील संशाेधक मिळून काम करत आहेत. संशाेधकांनी या प्रकल्पासाठी बाेलिनस गावाची निवड केली. येथे मूळ अमेरिकी, लॅटिन अमेरिकीसारखे विविध समुदायाचे लाेक राहतात. त्यांची तपासणी करून काेराेना संसर्गाला राेखण्याच्या क्षमतेचाही याद्वारे अभ्यास केला जात आहे. यूसीएसएफमध्ये असिस्टंट प्राेफेसर व बाेविनासचे निवासी डाॅ. एन्नाेर साॅयर म्हणाले, काेणत्याही आजाराचा प्रादुर्भाव हाेताे. हे मेडिकलशी संबंधित लाेकांना शिकण्यासाठी बाेलिनस हे गाव महत्त्वाचे ठरते. हे गाव राज्य मार्गावरून ३ किमी आडवळणाला आहे. तेथे जाण्यासाठी रस्ता नाही.

त्यामुळेच आम्ही अनेक आठवड्यांपासून ग्रामीण व स्थिर असलेल्या इकाेसिस्टिममध्ये वावरत आहाेत. अशा ठिकाणी काेराेनाचे संसर्ग कसा हाेताे हे जाणून घेणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे साॅयर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button