breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

अँजिओप्लास्टीनंतर नितीन गडकरी लागले कामाला

Mahaenews | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर अलीकडेच अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी लगेच नित्याचे काम देखील सुरू केले आहे.आठवड्याच्या प्रारंभी नितीन गडकरी यांची नागपुरातील डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांच्याकडे तपासणी करण्यात आली. निदानानंतर एक स्टेंट टाकण्यात आला. त्याच दिवशी त्यांना सुटीही देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केली.

गडकरी सध्या नागपुरातच असून येथूनच त्यांचे नित्याचे कार्यालयीन कामकाज सुरू आहे. लॉकडाउनच्या काळात त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकारी व वेगवेगळ्या घटकांसोबत बैठका घेतल्या. ‘मी फक्त एक दिवस इस्पितळात होतो. माझी प्रकृती पूर्णत: व्यवस्थित आहे. मी फिट आणि अक्टिव्ह आहे. चिंतेचे कारण नाही’ असे नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button