breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

अन्न-पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो माणूस? वाचा सविस्तर..

Without Food and Water : माणूस अन्न-पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो यासंदर्भात अनेक प्रकारचे संशोधन करण्यात आले आहे. या सर्व संशोधनाच्या निष्कर्षानुसार एखादा व्यक्ती अन्न आणि पाण्याचे सेवन न करता ८ ते २१ दिवस जिवंत राहू शकतो. मात्र याला काही अपवाद देखील आहेत. ते म्हणजे संबंधित व्यक्तीच वय किती आहे, त्याचे आरोग्य चांगले आहे का?, त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण किती आहे? या सर्व बाबींचा देखील विचार करावा लागेल.

परिणामी त्या अन्नत्याग केलेल्या व्यक्तीला नियमित करत असलेली कार्ये करताना पुरेशा कॅलरी शरीराला मिळणे आवश्यक असते. आणि या कॅलरी न मिळाल्यास त्याचा शरीरावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम झाल्याचं दिसून येतं. यातही दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे अन्नाचे कमी प्रमाणात सेवन केल्याने किंवा अन्नत्याग केल्याने शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि दुसरे म्हणजे पुरेसे अन्न घेऊनही शरीराला आवश्यक ते पोषक तत्वे न मिळणे. आणि अशा परिस्थितीत जेव्हा तुमच्या शरीराला अन्नातून आवश्यक तेवढ्या कॅलरी मिळत नाही तेव्हा तुमचे शरीर तुमच्या स्नायूंमध्ये असलेली शक्ती वापरण्यास सुरूवात करते आणि असे होऊनही आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यावर मृत्यू देखील ओढवू शकतो.

हेही वाचा – विजय वडेट्टीवारांच्या टीकेला मनोज जरांगेचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले..

तुम्ही अन्न-पाण्याशिवाय किती काळ जगू शकता याबाबत अजून तरी कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाहीये. मात्र आतापर्यंत केलेल्या संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की माणूस हा अन्न-पाण्याशिवाय जास्तीत जास्त एक आठवडाभरच जगू शकतो. मात्र याला देखील एक अपवाद आहे. जर तुम्ही अन्नाचा त्याग केला असेल आणि तुमच्या शरीराला वेळच्या वेळी पाणी मिळत असेल तर तुम्ही सहजरित्या २ त ३ महिन्यांच्या आसपास जिवंत राहू शकता. मात्र अन्नत्याग करणे किंवा पाण्याचा त्याग करणे हे शरीरासाठी खूप घातक ठरू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button