breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: ‘मॅनेजमेंट किंग’ दिपक मोढवे-पाटील यांचे ‘आपली माती-आपली माणसं’ भूमिकेतून मदतकार्य

– लॉकडाउनच्या काळात गावातील नागरिकांना मदतीचा हात

– कोरोनाची जनजागृती आणि मोढवे-पाटील परिवाराची संवेदनशीलता

आष्टी । महाईन्यूज । प्रतिनिधी

संपूर्ण देशात कोरोनामुळे हाहाकार सुरू आहे. लॉकडाउनमुळे चाकरमानी-कष्टकरी नागरिकांची उपासमार होत आहे. लॉकडाउनची झळ ग्रामीण भागातील शेतमजुरांनाही बसत आहे. अशा परिस्थितीत शहरातून ग्रामीण भागात आलेले काही संवेदनशील तरुण गावकरण्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. तसेच, कोरोनाबाबत जनजागृती आणि सोशल डिस्टंसिंगबाबत नागरिकांना मार्गदर्शनही करीत आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील उच्चशिक्षित आणि मॅनेजमेंट किंग अशी ओळख असलेले शहरभाजपाचे उपाध्यक्ष दिपक मोढवे-पाटील देशात लॉकडॉउन सुरू झाल्यानंतर आपल्या मूळगावी म्हणजेच आष्टी तालुक्यातील खुंटेफळ (वोटफळ) येथे गेले आहेत. शहरातील उद्योग-व्यावसाय लॉकडाउनमुळे बंदच आहे. त्यामुळे गड्या आपला गाव बरा…अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र, आपल्यातील संवेदशनशीलता आणि सामाजिक कार्याचे काम गावात सुरू ठेवले.

          भाजपा आमदार आणि राज्याचे माजी महसूलमंत्री सुरेश धस यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून दिपक मोढवे यांची गावात ओळख आहे. वास्तविक, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचे मोढवे-पाटील कट्टर समर्थक आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार धस यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना मदत करा, अशी सूचना मोढवे-पाटील यांना केली होती. त्यामुळे मोढवे-पाटील परिवार आणि आमदार सुरेश अण्णा धस मित्र परिवाराच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाबाबत सुरक्षेचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच, गावातील प्रत्येक कुटुंबात साखर वाटप करण्यात येत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आमचा खारीचा वाटा…या भूमिकेतून आम्ही काम करीत आहोत, असे मोढवे-पाटील यांनी सांगितले.

प्रशासनाला सहकार्य करा…नियमांचे पालन करा : मोढवे-पाटील

नागरिकांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. मार्गदर्शन सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास आपण कोरोनावर मात निश्चितपणे करणार आहोत, अशी प्रतिक्रीया दिपक मोढवे-पाटील यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button