breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी चिंचवडमध्ये स्वागत

  • 350 दिंडी प्रमुखांना मृदंग भेट

पिंपरी ( महा ई न्यूज ) – संत तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखीचे आज (मंगळवार) सांयकाळी चार वाजता भक्ती-शक्ती चौकात स्वागत करण्यात आले. तुकोबाच्या पालखीचे वरुण राजाने बरसाद करुन पालखींवर जलाभिषेक केला. यावेळी महापालिकेचे महापौर राहूल जाधव,  सर्व पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या वतीने  ३५० दिंडीप्रमुखांना मृदंग भेट देण्यात आले.   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, शिवसेनेचे राहूल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसे गटनेते सचिन चिखले, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्या साधना मळेकर, सुजाता पालांडे, आशा धायगुडे-शेडगे, माई ढोरे, अनुराधा गोरखे, अश्विनी चिंचवडे, आरती चोंधे, स्वीनल म्हेत्रे, निता पाडाळे, संगीता ताम्हाणे, कमल घोलप, नगरसदस्य प्रा. उत्तम केंदळे, विक्रांत लांडे प्रविण भालेकर, पंकज भालेकर, अमित गावडे, मोरेश्वर भोंडवे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, जावेद शेख, राजू मिसाळ, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, राजेंद्र राजापुरे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुर्गुडे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, श्रीकांत सवणे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात  तुकोबांच्या पालखीच्या दर्शनासाठी शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक जमले होते. यंदाही पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात राहणार आहे. आकुर्डीतील मुक्कामानंतर  बुधवारी सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. महापालिकेच्यावतीने पालखीतळावर वारकऱ्यांच्या विश्रांतीची सोय, तसेच भाविकांना पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिका, राजकीय पक्षानी, विविध सेवा भावी संस्थांनी ठिकठिकाणी मोफत वैदकीय सेवा, वारकऱ्यांची राहण्याची सोय, जेवण, पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था केली आहे. तसेच विविध संस्था, संघटनांनी पालखीचे जागोजागी स्वागत केले. त्याचप्रमाणे वारकऱ्यांना विविध वस्तूंचे वाटपही केले.

दरम्यान, बुधवार (दि.२६) पालखी पिंपरीतील एचए कॉलनीत पहिली विश्रांती घेईल. दुपारच्या दरम्यान कासारवाडी येथे दुसरी विश्रांती, दुपारच्या जेवनासाठी दापोडी येथे थांबेल. आणि त्यानंतर शिवाजीनगरकडे प्रस्थान करेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button