breaking-newsमुंबई

राज्यात ८७० शिवभोजन केंद्रातून १.९ कोटींपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे गरिबांना अन्न मिळावे यासाठी पाच रुपयांत शिवभोजन थाळी सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. १ जुलै ते २० जुलैपर्यंत ८७० शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे १९ लाख ४८ हजार ४३० शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात गरीब आणि गरजूंना एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ४०, जून महिन्यात ३० लाख ९६ हजार २३२, जुलैमध्ये आतापर्यंत १९ लाख ४८ हजार ४३० असे एकूण १ एप्रिल ते २० जुलै या कालावधीत १ कोटी ९ लाख २७ हजार ९५९ शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.

तसेच राज्यातील ५२ हजार ४३६ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे १ जुलै ते २० जुलैपर्यंत राज्यातील १ कोटी १३ लाख ७३ हजार ३३१ शिधापत्रिका धारकांना २५लाख ७२ हजार १०९ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button