breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

MPL : एमपीएलचे सर्व सामने मोफत पाहता येणार, वेळापत्रक पाहा..

MPL : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग म्हणजेच MPL लीगची सुरूवात गुरूवारी १५ जून रोजी सुरू होणार आहे. MPL मध्ये यंदा सहा संघ खेळणार आहेत. यामध्ये पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी हे सहा संघ लीगमध्ये असणार आहेत. नौशाद शेख हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. दरम्यान या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

पहिला सामना पुणेरी बाप्पा विरूद्ध कोल्हापूर टस्कर्स संघात गुरूवारी सायंकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. त्याआधी सायंकाळी ५.३० वाजता एमपीएल उद्घाटन समारंभाचे आयोजन केले गेले आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या सोहळ्यात लाईव्ह परफॉर्म करणार आहे.

हेही वाचा – राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रामदास आठवले यांचं मोठं विधान; म्हणाले..

एमीपएलचे सर्व सामने प्रेक्षकांना लाईव्ह डीडी स्पोर्टसवर पाहायला मिळणार आहेत. सोबत फॅनकोडवर या सामन्यांच्या ऑनलाईन स्टिंमिग केले जाणार आहे. तसेच पुण्यातील एमसीए स्टेडियमवर सर्वांना मोफत प्रवेश असेल.

MPL २०२३ चे वेळापत्रक :

१५ जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (सायंकाळी- ८ ते ११.२०)
१६ जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (दुपारी- २ ते ५.२०)
१६ जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – ८ ते ११.२०)
१७ जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- ८ ते ११.२०)
१८ जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (दुपारी – २ ते ५.२०)
१८ जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – ८ ते ११.२०)
१९ जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी- ८ ते ११.२०)
२० जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी- २ ते ५.२०)
२०जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – ८ ते ११.२०)
२१ जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- ८ ते ११.२०)
२२ जून- छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी – २ ते ५.२०)
२२ जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – ८ ते ११.२०)
२३ जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी- ८ ते ११.२०)
२४जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (दुपारी – २ ते ५.२०)
२४ जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी – ८ ते ११.२० )
२६ जून- क्वालिफायर १
२७ जून- एलिमिनेटर
२८ जून- क्वालिफायर २
२९ जून- अंतिम सामना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button