breaking-newsराष्ट्रिय

कुलभूषण जाधव यांना वकिल नेमण्यास न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली – कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याची सधी भारताला मिळायला हवी, असे न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानकडून या अगोदर भारतीय वकील नियुक्त करण्यास नकार देण्यात आलेला होता. आतापर्यंत कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला अनेकदा आंतरराष्ट्रीयस्तरावर तोंडघशी पडावं लागलेलं आहे.

दुसरीकडे पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी कुलभूषण जाधव प्रकरणी आम्ही राजकीय माध्यामातून पाकिस्तानच्या संपर्कात आहोत. सरकार कुलभूषण जाधव यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शक्य ते सर्व पावलं उचलत असल्याचे सांगितले आहे.

कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात असून हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली आहे. आयसीजेच्या निकालानुसार, काउंन्सलर अ‍ॅक्सेस तसेच मुक्त आणि निष्पक्ष सुनावणी पूर्व अट असल्याची भारताने पाकिस्तानला आठवण करुन दिली आहे.

या अगोदर कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. भारतानं याप्रकरणी प्रतिक्रिया देत पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button