TOP Newsताज्या घडामोडीमराठवाडा

आलिया-रणबीरचं 8 मजली अलिशान घर तयार, लक्ष्मीसोबत करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Alia and Ranbir kapoor) यांची चर्चा आहे. चर्चा का नाही होणार कारण त्यांना कन्यारत्न प्राप्त झालीये. त्यामुळे कपूर कुटुंबात (Kapoor Family) सध्या आनंदाचं वातावरण आहे. पण आता हे दोघे लवकरच आपल्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. ऋषी कपूर आणि नीतू सिंग (Rishi Kapoor and Nitu singh) यांचा कृष्णा राज बंगला पूर्णपणे तयार झाला आहे. पाली हिल येथे असलेला या बंगल्यात नुतणीकरणाचं काम सुरु होतं. हे घर पुन्हा रिनोव्हेट करण्यासाठी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी खूप मेहनत घेतली आहे. आता कपूर कुटुंब आपल्या लक्ष्मीसह या घरात गृहप्रवेश करणार आहेत.

कपूर कुटुंबाचं 8 मजली घर

कपूर कुटुंब म्हणजेच नीतू कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रिद्धिमा कपूर सोबत तिची मुलगी समारा हे सर्व या 8 मजली घरात शिफ्ट होणार आहेत. नीतू कपूर यांच्यासाठी एक मजला, दुसरा मजला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासाठी, याशिवाय बाळासाठी तिसरा मजला तयार करण्यात आला आहे. जेव्हा ती मोठी होईल आणि तिला स्वतःची वेगळी जागा हवी असेल तेव्हा ती त्यात शिफ्ट होईल. चौथा मजला रणबीर कपूरची बहीण आणि आलिया भट्टची वहिनी रिद्धिमा कपूर साहनी आणि तिची मुलगी समारा यांच्यासाठी ठेवण्यात आला आहे. जेव्हा ती मुंबईत येईल तेव्हा दोघंही याच मजल्यावर राहतील.

स्विमिंग पूल आणि ऑफीस

उर्वरित मजल्यावर एक मोठा स्विमिंग पूल असणार आहे. एका मजल्यावर कपूर कुटुंबासाठी ऑफिस तयार केलं जाणार आहे. एक मजला ऋषी कपूर यांच्या आठवणी जपण्यासाठी असेल.

अभिनेत्री आलिया भट्ट कपूरने 6 नोव्हेंबरला मुलीला जन्म दिला. ती सध्या रुग्णालयातच आहे. दोघे ही सुखरुप आहेत. रणबीर कपूर, आलियाची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्ट हॉस्पिटलमध्ये येता-जातांना दिसत आहेत. आलिया भट्टला कधीही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button