breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मनुवादी विचारांचे सरकार धोकादायक : डॉ. कुमार सप्तर्षी

पुणे ( महा ई न्यूज )-  वेगवेगळी आश्वासने आणि विकासांची स्वप्ने दाखवून सर्वसामान्य माणसांची मते मिळविण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी झाला. मात्र त्यानंतर आपल्या जातधर्माच्या नावाने तयार केलेल्या विचारकलहामुळे समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकांमध्ये जातपातीचे भेद पसरविणारे व मनस्मृतीचे समर्थन करणारे हे मनुवादी विचारांचे सरकार धोकादायक असल्याचे मत युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

युवक क्रांती दल, जागरूक पुणेकर मंच आणि ईव्हीएमविरोधी मंचतर्फे आयोजित ‘मनुस्मृती की भीमस्मृती’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. कुमार सप्तर्षी बोलत होते. दीपाली भांगे, मयुरी शिंदे, प्रशांत कनोजिया, जांबवंत मनोहर, दिलीपसिंग विश्वकर्मा आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली तेव्हा वैचारिक क्रांती झाली, परंतु अनेक जणांच्या मनात आजही मनुस्मृती जिवंत आहे. ब्राह्मण्यवादाच्या नावाखाली आजही काही समाज इतरांना आपल्या आधिपत्याखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, यासाठी रोजच्या व्यवहारातून आणि आपल्या विचारांमधून मनुस्मृती दूर करणे गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button