TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमुंबईव्यापार

अरेरे, मकर संक्रांतीच्या तोंडावर गूळ महागला

मुंबईः त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून साखरेचे दर स्थिर आहेत. काही महिन्यांपूर्वी 110 ते 140 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा तीळ आता मकर संक्रांतीच्या तोंडावर वाढू लागला आहे.

अतिक कोतवाल,जव्हार : तालुक्यात मकर संक्रांत सण शहरी तसेच ग्रामीण आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. वर्षाचा पहिला सण असताना येथील नागरिक आपापल्या नातेवाईक मित्रपरिवार यांना तिळगूळ देऊन “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” अशी साद घातली जाते. यंदा संक्रांतीच्या तोंडावरती गूळ महागला झाल्याने तिळाची स्निग्धता व गुळाचा गोडवा कडवटला असल्याचे बोलले जात आहे. मकर संक्रांतीला तिळगुळाचे महत्त्व आहे. तिळाची स्निग्धता अन् गुळाचा गोडवा प्रत्येकाच्या जीवनात यावा म्हणून या दोन वस्तूंपासून बनलेल्या पदार्थाची देवाण-घेवाण करण्याची परंपरा आहे. संक्रांतीसाठी डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून तिळगुळाचा लाडू, रेवडी, चिक्की, तसेच तिळात साखर घालून हलवा तयार केला जातो.
तालुक्यात संबंधित कच्च्या मालाचे उत्पादन होत नसल्याने आजूबाजूच्या मोठ्या बाजारपेठेतून माल तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध होत असतो . यंदा साध्या तिळाला 180 ते 230 रुपये किलोपर्यंतचा भाव मिळत आहे. यात दोन-तीन प्रकार उपलब्ध असतात असे एका व्यापार्‍याशी बोलताना कळले. गतवर्षी हा दर 15 ते 20 रुपयांनी कमी होता. गुळाचे दर सध्या स्थिर असले तरी, मागणी वाढली की दरातही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता येथील व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. राज्यात साखरेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. त्यामुळे साखरेचा साठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून साखरेचे दर स्थिर आहेत. काही महिन्यांपूर्वी 110 ते 140 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा तीळ आता मकर संक्रांतीच्या तोंडावर वाढू लागला आहे.

सेंद्रीय गुळाला मागणी
दरवर्षी गुळाचे दर कमी-जास्त होतात. मकर संक्रांतीच्या पर्वावर गुळाची मागणी वाढत असल्याने दरही वाढलेले असतात. अन्य वेळी गुळाचे भाव स्थिर असतात. किरकोळ बाजारात गूळ 60 ते 75 रुपये किलोने मिळतो. रासायनिक गुळापेक्षा सेंद्रीय गुळाचा भाव 10 ते 20 रुपयांनी अधिक आहे. त्यातच मकर संक्रांतीच्या पर्वावर सेंद्रीय गुळाला हल्ली मोठी मागणी वाढली आहे. यंदाच्या मकर संक्रांतीला सेंद्रीय गुळाची मागणी वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button