breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

भाजपच्या ‘भाऊं-दादां’कडून आपल्या अपयशाची जाहीर कबुली; संजोग वाघेरे यांचा घणाघाती आरोप

  • वीस वर्षे आमदार असताना प्राधिकरणबाधितांंचा प्रश्न जैसे थे ठेवला
  • टक्केवारीसाठी कर्मचा-यांची धन्वंतरी योजना बंद करणा-यांची पत्रकबाजी

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी 

महापालिका निवडणूक तोंडावर आली असल्याने भाजपचे दोन्ही आमदार सक्रीयता दाखविण्यासाठी पत्रकबाजी करत आहेत. परंतु, प्रसिध्दीच्या मोहापायी भाजपचे हे ‘भाऊ-दादा’ आपल्याच अपयशाची कबुली जाहीरपणे देत आहेत. वीस वर्षे आमदार असताना यांना प्राधिकरण बाधितांच्या परताव्याचा प्रश्न सोडवता आला नाही. तर टक्केवारीचा विमा आणून ज्यांनी कर्मचा-यांची धन्वंतरी योजना बंद केली. तेच दिशाभूल करण्यासाठी दिखावा करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे.

प्राधिकरमण बाधितांच्या पराताव्याचा प्रश्नावरून चिंचवड भाजपचे आमदार राज्य शासनाकडे बोट दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तर, त्यांच्या भोसरीच्या आमदारांनी यांनी महापालिका कर्मचा-यांच्या धन्वतंरी योजना लागू करण्याची मागणी निवदेनाव्दारे केली होती. भाजपच्या या दोन्ही आमदारांनी मांडलेल्या या भूमिकेचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी घेतला. ते म्हणाले की, भाजपला आयते मिळालेले हे दोन्ही भाऊ-दादा निवडणुका आल्या की शहरवासीयांची आणि मतदारांची दिशाभूल करतात.

केवळ निवडणुकीच्या वेळी लोकांचे आणि शहराचे प्रश्न आठवतात. इतर वेळी मोठ मोठ्या निविदा काढण्यात ते मश्गूल असतात. भाजपच्या चिंचवडच्या आमदारांनी प्राधिकरण बाधितांचा परताव्या प्रश्न उपस्थित करत त्यांचे खापर राज्यातील सध्याच्या सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला. मुळात हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे ते सांगत आहेत. ते एक वेळा विधान परिषदेचे आणि तीन वेळा विधानसभेचे आमदार आहेत. राज्यात भाजप सत्तेत असतानाही ते आमदार होते. त्यांना आमदार आणि सत्तेत असताना हा प्रश्न निकाली काढता आला नाही. आता त्याचे भांडवल करून इतरांना बदनाम करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्याला शहरातील नागरिक आणि प्राधिकरण बाधित शेतकरी भीक घालणार नाहीत.

महापालिका कर्मचा-यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने धन्वंतरी स्वास्थ योजना लागू केली होती. ही योजना भाजपच्या कार्यकाळात बंद करून विमा योजना लागू करून टक्केवारी लाटण्याचा डाव भाजपच्या मंडळींनी आखला. विमा कंपनीला कर्मचा-यांनी कडाडून विरोध केला. परंतु, आता भोसरीचे आमदार धन्वंतरी योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. त्यांना निवडणुकीच्या तोंडावर पत्रकबाजी करून आपल्याला कर्मचा-यांचा पुळका आल्याचे ते भासवत आहेत. प्रत्यक्षात विमा योजना लागू करण्याचा कुटीर डाव कर्मचारी ओळखून आहेत, असेही वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

  • भाजप आमदारांचा पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप

महापालिकेत पाच वर्षे भाजपचे पाशवी बहुमत आहेत. मात्र, त्यांच्या नगरसेवकांना बोलण्याचा देखील अधिकार नाही. महानगरपालिकेत आमदारांच्या सांगण्यावरून सगळ्या निविदा आणि कामे होत आहेत. ते सांगतील तेच नगरसेवक बोलतात. जे नगरसेवक भाजपच्या चुकीच्या गोष्टीवर खरं बोलतात. त्यांच्यावर अन्याय केला जातो. महापालिकेतील नगरसेवकाची भूमिका पत्रकबाजी आणि कामात हस्तक्षेप करून आमदार बजावत आहेत, अशी टीका वाघेरे पाटील यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button